Posts

Showing posts from July, 2021

Jalachakara

 वाफ , द्रव किंवा बर्फ अशा कोणत्याही स्वरूपात पाणी पृथ्वीवर सर्वत्र उपलब्ध आहे . सूर्याच्या उष्णतेमुळे , उच्च तापमानामुळे , पाण्याचे स्थित्यंतर वाफेमध्ये होण्याचे कार्य अखंडपणे चालूच असते . तलाव , नदी , समुद्र अशा कोणत्याही प्रकारच्या उघड्या पाणीसाठ्यामध्ये हे कार्य अविरत सुरू असते . त्याचप्रमाणे , प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवनही चालूच असते . या बाष्पीभवनामुळे निर्माण झालेली वाफ हलकी होऊन वरवर जात असते . या सर्व वाफेचे ढग तयार होऊन , ते वातावरणात उंच - उंच जातात . त्यामध्ये सूक्ष्म धुळीचे कण मिसळून निर्माण झालेले ढग उंचावरील वातावरणातील थंड हवेमुळे गोठून पाण्याचे थेंब तयार होतात . हे ढग वाऱ्याबरोबर वाहत असताना डोंगर किंवा उंच पर्वतराजीमुळे अडतात व अधिक उंचावर जातात . एकत्र आलेल्या अशा ढगांचा आकारही वाढतो . त्याबरोबरच सूक्ष्म कणांनी बनलेले पाण्याचे थेंबही आकाराने मोठे व जड होतात आणि शेवटी पावसाच्या रूपाने , पुन्हा जमिनीवर कोसळतात . हे पावसाचे पाणी डोंगरउतारावरून परत वाहत जाऊन त्याचे छोटे ओहळ - ओढ्यांचे स्वरूप घेतात आणि पुढे स्वतःच नदीचे रूप घेतात किंवा...